Friday, 25 November 2016

ll सत्संग ll

ll सत्संग ll

संत कबिरानी कर्मकाण्डावर जबर प्रहार करून आपल्या साहित्या मधे खालील उदाहरणा द्वारे सर्वाना सचेत केले आहे

करम गति टारे नाही टरी
मुनि वशिष्ठ से पंडित ज्ञानी
सोध के लगन धरी ll
सीता हरण मरण दशरथ को
बन में बिप्पत परी
करम गति टारे नाही टरी ll
नीच हाँथ हरिश्चंद्र बिकाने
बलि पाताल परी
कोटि गाय नीत पूण्य करत नृप
गिरगिट योनी परी
करम गति टारे नाही टरी ll
पांडव जिनके आप सारथी
तिन पर विपत परी
दुर्योधन को गर्व घटायो
यदुकुल नाश करी ll
करम गति टारे नाही टरी
राहु केतु अरु भानु चन्द्रमा
विधि संयोग परी
कहे कबीर सुनो भाई साधो
होनी हो के रही
करम गति टारे नाही टरी ll

संत कबीर म्हणतात
कर्मगति कोणाच्यानेही कश्याच्याही आणि कोणत्याही विधिने टळत नाही
आपण लग्न मुहूर्त पाहुन विवाह ठरवतो
प्रत्यक्ष मर्यादापुरुषोत्तम "रामचन्द्र" यांच्या विवाहाचा मुहूर्त मोठमोठ्या ऋषि मुनि सहित स्वत: वशिष्ठ मुनिनि पाहिला तरी राज्याभिषेक सोडून वनवासात जावे लागले पुढची कथा सर्वश्रुत आहे ... सीता हरण ... दशरथाचे मरण ... वनातील विपत्ति

पुढे कबीर साहेब म्हणतात
सत्यवान म्हणून राजा हरिश्चंद्र सर्वश्रुत आहे तरी त्याला डोंबाच्या घरी पाणी भरावे लागले
ही कर्मगति होती ती कोणाच्याहीने टळली नाही
नित्य कोटि गायींचे दान करणारा राजाला "सरड्या" च्या योनीत जावे लागले
ही कर्मगति होती ती टळली नाही

नंतर कबीर साहेब म्हणतात
पांडवांचे सारथि साक्षात् श्रीकृष्ण यांच्या यादव कुळाचा नाश झाला ही कर्मगति होती ती कुणाच्यानेही टळली नाही शेवटी पारद्याच्या बाणाने मृत्यु आला ही कर्मगति होती
ती कोणाच्यानेही टळली नाही

शेवटी काय तर

कर्म प्रधान विश्व करी राखा
जिन जस किया तिन तस फल चाखा

कोणत्याही पूजापाठ विधिने कर्म कापल्या जात नाहीत उलट कर्म वाढतात आणि पुन्हा ती भोगावी लागतात
असे संत कबीर म्हणतात

No comments:

Post a Comment